आर्यनमॅन सूट घाला आणि पक्षांसारखे आकाशात विहरा


ब्रिटनचा हौशी उद्योजक रिचर्ड ब्राउनिंग याने एक खास सूट तयार केला असून हा सूट घालून कुणीही आकाशात विहार करू शकतो. हा सूट विर्कीसाठी उपलब्ध आहे. त्याची किंमत आहे ४.४२ लाख डॉलर म्हणजे ३ कोटी ४ लाख रुपये. हा सूट घालून माणूस ताशी ५० किमीच्या वेगाने १२ हजार फुट उंचीवरून उडू शकतो. या सूटचे प्रात्यक्षिक अनेक ठिकाणी केले गेले आहे. हे सूट तयार करण्यासाठी रिचर्डने ग्रॅव्हिटी नावाची कंपनी स्थापन केली आहे.

या सुटला पाच जेट इंजिन आहेत. त्यात खास तंत्रज्ञान आणि थ्री डी प्रिंटींगचा वापर करून सूटचे पार्टस बनविले गेले आहे. रिचर्डचा लंडन शहरात तेलाचा व्यापार आहे. त्याचे वडील विमान कंपनीत इंजिनिअर होते, आजोबा पायलट होते तर पणजोबा हेलिकॉप्टर बनवीत असत. रिचर्ड सांगतो त्याने आयर्नमन सिनेमा पहिला आणि तेव्हाच तसा सूट बनविण्याचा निर्णय घेतला. या सूटचा उपयोग लष्कराला होऊ शकतो. जेथे विमाने आणि हेलिकॉप्टर पोहोचू शकत नाहीत तेथे हा सूट घालून जवान पोहोचू शकतील असा त्याचा दावा आहे.
सध्या हा सूट डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये विक्रीसाठी ठेवला गेला असून अनेकांनी त्यासाठी संपर्क केला असल्याचे समजते. या सुटचे व्हिडीओ त्वितर, इंस्ताग्राम आणि फेसबुकवर पोस्ट केले गेले आहेत.

Leave a Comment