पेप्सी कोकच्या रिकाम्या बाटल्यांसाठी बायबॅक योजना


शीतपेये आणि पाण्याच्या हवाबंद बाटल्या विकणाऱ्या पेप्सी, कोका कोला आणि बिसलेरी कंपन्यांनी रिकाम्या झालेल्या बाटल्या परत विकत घेण्यासाठी योजना आखली आहे. महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर या योजनेवर विचार केला गेला असून त्यामुळे प्लास्टिक कचरा साठणार नाही असा उद्देश आहे. या कंपन्या त्यांच्या नव्या बाटल्या बायबॅक किमतीसह बाजारात आणत आहेत. ग्राहकांनी बाटल्या विकत घेताना या लेबलसह घ्याव्या असे सांगितले जात आहे.

किती क्षमतेच्या बाटल्या या योजनेत आहेत किंवा त्या परत केल्यावर किती किंमत मिळणार याचा खुलासा झाला नसला तरी पेप्सीने हि किंमत १५ रु. ठरविली असल्याचे इकोनॉमिक टाईम्सने म्हटले आहे. बाटल्या किती रकमेला परत घ्यायच्या ती किंमत ठरविण्याचा अधिकार सरकारने कंपनीला दिला आहे असेही सांगितले जात आहे.

पेप्सीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार जेम्स एन्क्वायरो कंपनीच्या सहकार्याने हे काम केले जाणार असून हि कंपनी रिवर्स वेंडिंग मशीन तयार करते. अशी मशीन्स ठिकठिकाणी बसविली जाणार असून अनेक जागी कलेक्शन सेंटर सुरु केली जाणार आहेत.

Leave a Comment