अॅपलवर येऊ शकते भारतीय बाजारपेठ गमावण्याची नामुष्की


नवी दिल्ली – गेल्या काही मागील महिन्यापासून जगप्रसिद्ध टेक कंपनी अॅपल आणि दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) यांच्यामध्ये कुरबुर सुरू असून पण हि कुरबुर जर अशीच सुरू राहिले तर भारतीय बाजारपेठ गमावण्याची नामुष्की अॅपलवर येऊ शकते.

अॅपलने डीएनडी अॅप स्पॅम कॉल रिपोर्ट करण्यासाठी इंस्टाल करावे, अशी ट्रायची मागणी आहे. पण अॅपलने यूजर्सची गोपनीयता सुनिश्चित करण्यासाठी, असे कारण देत असे करण्यास नकार दिला आहे. तथापि, अॅपलवर एका नव्या आदेशामुळे हे अॅप इंस्टाल करण्याची वेळ ओढवू शकते. असे अॅपलने न केल्यास भारतीय बाजारपेठ गमावण्याची परिस्थिती अॅपलवर उद्भवू शकते.

गुरुवारी (१९ जुलै) एक नवा नियम ट्रायने सुरू केला असून या नियमानुसार सर्व मोबाईल फोन्समध्ये असे अॅप असायला हवेत ज्यामुळे ग्राहकाला स्पॅम कॉल आणि मॅसेज रिपोर्ट करता येऊ शकतील. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी ट्रायने मोबाईल कंपन्यांना ६ महिन्यांची मुदत दिली आहे.

अँड्राईडसाठी डीएनडी अॅप ट्रायने २०१७ मध्ये लाँच केले होते. पण या अॅपला अॅपल स्टोरमध्ये स्थान देण्यास कंपनीने नकार दिला होता. अॅपलने थर्ड पार्टी अॅप्सला कधीही यूजर्सचे कॉल लॉग आणि मॅसेजेस वाचण्याची परवानगी दिलेली नाही. भारतातही त्यांनी हीच पॉलिसी अवलंबवण्याचा निर्णय घेतला होता.

यावर बोलताना ट्रायने सांगितले, की डीएनडी अॅपला जर स्थान देण्यात आले नाही तर भारतीय नेटवर्क अॅपल फोनवर चालू शकणार नाही. अॅपलचा वापर भारतात होऊ शकणार नाही, असे ट्रायने स्पष्ट केले आहे. यूजर्सचे कॉल आणि संदेश डीएनडी अॅप रेकॉर्ड करत असल्याने त्यांच्या प्रायव्हसीचे हे उल्लंघन ठरेल असा दावा अॅपलने केला आहे.

Leave a Comment