जिओच्या नव्या फोनसाठी मोजावे लागणार १०९४ रुपये


नवी दिल्ली : ग्राहकांना ५०१ रुपयांमध्ये जुन्या फोनच्या बदल्यात नवा फोन रिलायन्स जिओच्या मान्सून ऑफरनुसार मिळणार असल्याची चर्चा होती. पण हा फोन मिळविण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांना आता त्यासाठी १,०९५ रुपये खर्च करावे लागणार आहेत. ग्राहकांना या फोनसोबत सहा महिन्यांसाठी ५९४ रुपयांचा रिचार्जदेखील करावा लागणार असल्याचे कंपनीच्या नियम आणि अटींमध्ये म्हटले आहे.

दरम्यान फोनच्या बदल्यात घेतले गेलेले ५०१ रुपये ३ वर्षांनतर ग्राहकांना परत दिले जाणार आहेत. मान्सून ऑफर नुसार हा फोन ५०१ रुपयांत मिळेल आणि १०० टक्के ही रक्कम परत मिळेल असेही कंपनीच्या एका नोटमध्ये म्हटले आहे. जिओ फोन यानुसार फ्री होऊन जातो. ही रक्कम नियम आणि अटींनुसार परत केली जाणार आहे.

या संधीचा लाभ सद्यस्थितीतील फीचर फोन, बॅटरी तसेच चार्जरसोबत आणणाऱ्या ग्राहकांना मिळणार आहे. काही वापरकर्त्यांना कमी डेटाची गरज असते त्यांना कमी दरातील फोन उपलब्ध करुन देणार असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आलेय. यासाठी ९९ रुपयांमध्ये २८ दिवसांसाठी फ्री वॉईस कॉल, प्रति दिन ०.५ जीबी डेटा आणि ३०० एसएमएस दिले जाणार आहेत. यामुळे ग्राहकांचा खर्च ५० टक्के कमी होणार आहे.

Leave a Comment