‘हमारा बजाज’चे भारतीय बाजारात पुनरागमन


२००६ पर्यंत भारतीय रस्त्यांवर धावणारी सर्वांची लाडकी स्कूटर ‘चेतक’च्या माध्यमातून बजाज पुन्हा एकदा भारतीय बाजारात पुनरागमन करत आहे. याची तयारी बजाज कंपनीकडून सुरू करण्यात आली असून मीडिया रिपोर्ट्सनुसार चेतक स्कूटर पुन्हा एकदा बजाज कंपनी ऑटो मार्केटमध्ये आणणार आहे.

मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध असलेली हि स्कूटर बंद झाल्यानंतरही अनेकवेळा चेतकच्या परत येण्याची चर्चा होत होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार भारताता बजाज चेतक स्कूटर २०१९ मध्ये लाँच होऊ शकते. १९७२ ते २००६ पर्यंत बजाज चेतक स्कूटरचे उत्पादन केले जात होते. परंतु काळानुरुप यात बदल न केल्याने व कंपनीने बाईक्स निर्मितीवर लक्ष केंद्रीत केल्याने या स्कूटरचे उत्पादन २००९ मध्ये बंद करावे लागले.

महाराणा प्रताप सिंह यांचा घोडा चेतकच्या नावावरून बजाज चेतक स्कूटरचे नाव ठेवण्यात आले होते. ‘हमारा बजाज’ अशी टॅगलाइन चेतकला देण्यात आली होती. या स्कूटरची विक्री जोरात होत होती. गाडीवाडी डॉट कॉमवर आता या नव्या बजाज चेतक स्कूटरचे फोटो लीक झाले आहेत.

Leave a Comment