बीएमडब्ल्यूची मोटोराड एचपी ४ रेस बाईक भारतात सादर


बीएमडब्ल्यूने मोटोराड एचपी ४ रेस बाईक भारतात सादर केली असून या बाईकची एक्स शो रूम किंमत आहे ८५ लाख रुपये. ट्रॅक रेसिंग शौकिनाना हि बाईक पसंत पडेल असा दावा केला जात आहे. ही बाईक बनविताना कार्बन फायबरचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला असल्याने तिचे वजन कमी झाले आहे.

या बाईकची ब्रेकिंग सिस्टीम, सस्पेन्शन, इलेक्ट्रोनिक्स अव्वल दर्जाचे आहे, चाके कार्बन फायबरपासून बनविली गेली आहेत. या बाईकच्या स्टँडर्ड मॉडेलचे वजन २०८ किलो आहे मात्र कार्बन फायबरच्या वापरामुळे रेसर मोडेलचे वजन १७१ किलोवर आले आहे. या बाईकचा वापर सुपरबाईक वर्ल्ड रेसिंग चँपियनशिप मध्ये करता येणार आहे.

एकाच रंगात हि बाईक उपलब्ध असून तिची जगभर विक्रीसाठी फक्त ७५० युनिट बनविली गेली आहेत. हे बाईक नेहमीच्या रस्त्यावर राईड करण्यासाठी वैध नाही असे समजते.

Leave a Comment