हा पक्षीही घरट्यात लावतो दिवे


आपण कितीही माहिती मिळवत असलो, नवनवीन गोष्टी पाहत असलो तरी अनेक गोष्टी आपल्याला नवीन असतात. म्हटले तर साध्या वाटणारया या गोष्टी कधी मनोरंजक असतात तर कधी ज्ञानात भर घालणाऱ्या असतात. अश्याच काही गोष्टी माझा पेपरच्या व्हाचाकांसाठी.

जगात विविध प्रकारच, विविध आकाराचे पक्षी आहेत. हि दुनियाच काही वेगळी आहे. अंधार पडला कि माणूस चटकन बटन दाबतो आणि दिव्याच्या स्वच्छ प्रकाश मिळवितो. अनेक प्रयोगातून माणसाने वीज निर्मितीचे ज्ञान मिळविले. आपल्याला हे माहित आहे का की फिलिपिन्स मधील बोया नावाच्या पक्षालाही अंधार आवडत नाही. अंधार पडला कि हा पक्षी चक्क काजवे गोळा करून आणतो आणि आपल्या घरट्याबाहेर त्यांना लटकावून ठेवतो.


पृथ्वीवर अनेक उंच शिखरे आहेत. जगातील सर्वाधिक उंच शिखर आहे एव्हरेस्ट. पण पर्वतांच्या या शिखर उंचीला निसर्गानेच मर्यादा घातली आहे. पृथ्वीवर १५ हजार मीटर पेक्षा उंचीचे शिखर बनू शकत नाही आणि त्याला कारण आहे पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण. पहिल्याचा सफरीवर निघालेले टायटानिक हे जगातील त्यावेळचे सर्वात अलिशान जहाज आपल्याला माहिती आहे. हे जहाज तयार झाले तेव्हा त्याच्या उंचीएवढी एकही इमारत जगात बांधली गेली नव्हती. या जहाजाच्या चिमण्या इतक्या उंच होत्या कि त्यातून दोन ट्रेन सहज जाऊ शकल्या असत्या.


इटलीच्या आत आणखी एक चिमुकला देश आहे आणि तो म्हणजे व्हॅटीकन सिटी. या देशाचे क्षेत्रफळ आहे ०.२ चौरस मैल. या देशाची लोकसंख्या आहे ७७०. पण विशेष असे कि यातील एकही या देशाचा रहिवासी नागरिक नाही. माणसाला नेहमीच स्वप्ने पडतात. प्रत्येकाने कधीना कधी एक तरी स्वप्न पाहिलेले असतेच. असे म्हणतात कि आपण स्वप्नात जे चेहरे पाहतो, ते प्रत्यक्षात आपण कुठे न कुठे, कधीतरी पाहिलेले असतात.

Leave a Comment