जुना जिओ फोन देऊन तुम्ही घेऊ शकत नाही जिओचा नवा फोन


मुंबई : काल संध्याकाळपासून जिओच्या पावसाळी ऑफर सुरूवात झाली असून तुम्हाला यात ५०१ रूपयात जिओचा ४ जी फीचर फोन खरेदी करता येईल. या ऑफरची सुरूवात या आधी २१ जुलै रोजी होणार होती. जिओ मान्सूनच्या ऑफरनुसार, कोणत्याही जुन्या फोनच्या बदल्यात जिओचा १५०० रूपयांचा जिओ फोन तुम्हाला ५०१ रूपयात मिळणार आहे.

कोणत्याही कंपनीचा जुना फोन दिल्यानंतर, ५०० रूपये जिओला द्या, आणि त्या बदल्यात १५०० रूपयाचा जिओ फोन फक्त ५०० रूपयात मिळवा. तुम्हाला यापूर्वी खरेदी केलेला जिओ फोन देऊन हा नवीन फोन नाही मिळणार, तर जो जुना फोन तुम्ही जिओला देणार आहात तो, दुसऱ्या कंपनीचा जुना फोन असला पाहिजे. तीन वर्षानंतरच जुना जिओ फोन हा परत घेतला जाणार आहे. तसेच जो फोन देऊन तुम्ही जिओ घेणार आहात तो फोन सुरू असला पाहिजे.

जिओ फोनसोबत मिळणाऱ्या फोनच्या प्लानविषयी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, हा प्लान ४९ रूपयांचा आणि १५३ रूपयांचा आहे. २८ दिवसांची मुदत ४९ रूपयांच्या प्लानमध्ये असून यात प्रत्येक दिवशी १ जीबी डेटा, ५० मेसेजेस आणि अनलिमेटेड फोन तुम्ही करू शकता. तसेच १५३ रूपयांचा प्लानमध्ये २८ दिवसांपर्यंत प्रत्येक दिवशी दीड जीबी डेटा, म्हणजेच ४२ जीबी डेटा जास्त मिळेल आणि रोज १०० मेसेजेस देखील करता येतील. या प्लानमध्ये देखील अनलिमिटेड कॉलिंग करता येणार आहे.

जिओ फोनच्या फीचर्सविषयी जर आपण बोलायचं झालं, तर ४ जी सपोर्ट, २.४ इंची डिस्प्ले, २००० एमएएच की बॅटरी, ५१२ एमबी रॅम आणि ४ जीबी स्टोरेज आहे, ज्यात १२८ जीबी पर्यंत डेटा वाढवता येऊ शकतो. फोनमध्ये २ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा तसेच ०.३ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय व्हीओएलटीडी आणि व्हीओवाय-फाय म्हणजेच व्हाईस वायफाय मिळेल, याशिवाय फोनमध्ये एफएम, वाय-फाय, जीपीएससारखे फीचर्स असतील.

विशेष सूचना : ५०१ रूपयात जिओ फोन मिळवण्याची संपूर्ण स्कीम वाचा, फोन खरेदी करण्यापूर्वी नियम वाचून खात्री करा, नंतरच खरेदी करा

Leave a Comment