खोट्या बातम्यांच्या विरोधात आता फेसबुकही सज्ज


भारतासहित जगभरात खोटी आणि प्रक्षोभक माहिती प्रसारित करण्याबद्दल चोहोकडून टीका झेलणाऱ्या फेसबुकने आता या बातम्यांच्या विरोधात कंबर कसली आहे. आपल्या संकेतस्थळावरून खोट्या बातम्या आणि खोटी माहिती पाठविण्यास सुरुवात करण्याची घोषणा कंपनीने केली आहे.

फेसबुक आतापर्यंत केवळ प्रत्यक्ष हिंसेचे आव्हान असलेला मजकूरच काढून टाकत होता. मात्र आता नवीन नियमांतर्गत हिंसेला उत्तेजन देणार्‍या कोणत्याही प्रकारची छायाचित्रे व माहिती काढून टाकणार आहेत. भारत तसेच म्यानमारमध्ये हिंसा भडकावण्यामध्ये फेसबुकचे मदत झाली असल्याचा आरोप अनेकांनी केला होता. तसेच अमेरिका व युरोपमध्ये खोट्या बातम्या प्रसारित करण्याचे आरोपही कंपनीवर झाले होते.

“आम्ही अनेक संघटना सोबत मिळवून अशा प्रकारच्या पोस्ट निश्चित करत आहोत. एखाद्या संघटनेसोबत काम करून योग्य परिणाम मिळाला नाही तर अन्य एखाद्या संस्थेची मदत घेण्यात येईल,” असे कंपनीने म्हटले आहे.

‘‘चुकीच्या माहितीचे अनेक प्रकार आहेत आणि ते हिंसा भडकवत आहेत. आम्ही नियमांमध्ये बदल करणार आहोत व त्यामुळे असा मजकूर काढून काढून टाकणे आम्हाला शक्य होईल. काही महिन्यांमध्ये या धोरणावर अंमलबजावणी सुरू होईल,” असे कंपनीच्या एका प्रवक्त्याने सांगितले.

Leave a Comment