रशियाने अमेरिकेला केवळ सात मिलियन डॉलर्समध्ये विकले अलास्का…!


जर अलास्का आजही रशियाचा, किंवा सोव्हियेत संघाचा हिस्सा असते, तर जगाचा नकाशा किती वेगळा दिसला असता ! बहुतेक अमेरिकन्सना, किंवा बहुतेक आंग्लभाषिक लोकांना, अलास्का हे पहिल्यापासूनच अमेरिकेच्या अधिपत्याखाली असावे असे वाटते. पण ही समजूत चुकीची आहे. किंबहुना अलास्काचा विशालकाय भूभाग हा १९६० सालापर्यंत वेगळे राज्य म्हणूनही ओळखला जात नव्हता, ही वस्तुस्थिती आहे. अमेरिका खंडाच्या अर्ध्या भूभागाइतका विस्तार असणारा अलास्का पृथ्वीवरील सर्वाधिक नैसर्गिक संसाधने उपलब्ध असणारा प्रदेश म्हणून ओळखला जातो. पण काही दशकांपूर्वी अलास्का हा रशियाचा भाग होता.

साल १८०० च्या सुमारास अमेरिकेने आपले अधिपत्य अनेक भूभागांवर स्थापित करण्यास सुरुवात केली. तेव्हा कॅलिफोर्नियातिला काही प्रांतांवर रशियाचे अधिपत्य असून, तिथे त्यांच्या काही आऊटपोस्ट्सही होत्या. १८५० साली फ्रांस, ब्रिटन आणि टर्की यांनी संयुक्तपणे रशियाचा युद्धामध्ये पराभव केला. युद्धाच्या नंतर आधीच कंगाल होण्याच्या मार्गावर असणाऱ्या रशियाला अलास्कासारखा प्रदेश आपल्या अधिपत्याखाली राहू देणे परवडणारे नव्हते. त्याशिवाय ब्रिटनकडून वारंवार हल्ले होत रहाण्याचीही भीती होतीच.

रशियाला आपले अस्तित्व ठिकवून ठेवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये पैसा उभा करणे गरजेचे होते. तसेच कॅनडा मार्गे अलास्कावर ब्रिटिशांनी कब्जा करणेही रशियाला परवडणारे नव्हते. त्यामुळ अलास्काचा भूभाग रशियाने अमेरिकेला देऊ केला. यासाठी अतिशय घाईघाईने ‘डील’ उरकण्यात आले, आणि अमेरिकेने अलास्काच्या बदल्यात रशियाला सात मिलियन डॉलर्स द्यायचे असा करार ठरला.

अलास्काचा भूभाग लक्षात घेतला, तर त्याच्या दर एकर जागेमागे केवळ दोन सेंट इतकी रक्कम देऊन एकूण सात मिलियन डॉलर्सच्या बदल्यामध्ये अमेरिकेने अलास्कावर आपले अधिपत्य स्थापित केले. विसाव्या शतकामध्ये अलास्कामध्ये सापडलेल्या तेलाच्या खाणींमुळे अमेरिकेचा प्रचंड आर्थिक फायदा झाला.

Leave a Comment