मस्त लोकेशनच्या प्राचीन किल्लात आता आहे शाही हॉटेल


पर्यटक तसे सतत नवीन काहीतरी पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी भुकेलेले असतात. आपण जेथे जाऊ त्या जागा खास असाव्यात अशी त्यांची नेहमीच इच्छा असते. हि इच्छा पुरी करू शकेल असे एक ठिकाण इंग्लंडच्या सोलेंट सिटी मध्ये आहे. त्याचे नाव आहे नो मॅन लँड फोर्ट. इंग्लंडच्या सर्वात मोठ्या दोन नंबरच्या बेटावर हा प्राचीन किल्ला असून या बेतला आयसल ऑफ विट असे म्हटले जाते. या समुद्री किल्ल्याचे बांधकाम १८८० साली पूर्ण झाले तेव्हाच त्याच्यासाठी २ कोटी २७ लाख खर्च केला गेला होता.


हा किल्ला बांधायला रॉयल कमिशनने १८५९ साली मंजुरी दिली होती. क्रिमियन वॉर नंतर नेपोलियन ३ चा हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेऊन इंग्लंडचे संरक्षण करता यावे यासाठी समुद्रात बेटावर मोक्याच्या जागी हा किल्ला बांधला जाणार होता. त्यानुसार त्याचे काम सुरु झाले आणि ते १८६७ ते १८८० या काळात पूर्ण केले गेले. मात्र या किल्ल्याचा म्हणावा तसा उपयोग केला गेला नाही. काही काळ तो ब्रिटीश जलसेनेचे मुख्य बंदर होता. किल्ल्यातील पाणी दुषित झाल्याने तो बंदच केला गेला आणि त्यानंतर तो कावळे, चिमण्या अश्या पक्षांचे निवासस्थान बनला.

२००५ साली हा किल्ला प्रथम विकला गेला. त्यानंतरही अनेक वर्षे तो एकाकडून दुसऱ्याला विकला जात होता. मात्र २०१५ साली त्याचे शाही हॉटेलमध्ये रुपांतर केले गेले. या किल्ल्यावरुन चोहोबाजूनी सागराचे सौंदर्य पाहता येते. आणि निवासासाठी हॉटेल मध्ये अतिशय अलिशान सुविधा उपलब्ध आहेत.

Leave a Comment