१०० च्या नव्या नोटेचे असे आहे गुजरातशी नाते


रिझर्व बँक ऑफ इंडियाने चलनात १०० रुपये मूल्याची नवी नोट येत असल्याची घोषणा केली आहे. फिकट जांभळ्या रंगाच्या या नोटेवर म.गांधी, अशोकस्तंभ, प्रॉमिस क्लॉज, गव्हर्नर उर्जित पटेल यांची सही या नेहमीच्या सर्व आवश्यक प्रतिमा असतील मात्र पाठीमागच्या बाजूला असेल गुजरातच्या पाटण जिल्ह्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक राणी कि बाव या विहिरीची प्रतिमा. म्हणजे नव्या नोटेचे गुजराथशी असे नाते असेल. २०१४ साली या विशेष विहिरींच समावेश जागतिक वारसा स्थळात युनेस्कोने केलेला आहे.

अर्थात नोटांवर ऐतिहासिक स्थळांच्या प्रतिमा यापूर्वीही दिल्या गेल्या आहेत. ५०० रु.च्या नव्या नोटेवर लाल किल्ला आहे तर २०० रु.च्या नव्या नोटेवर सांची येथील स्तूप आहे. ५० रु. च्या नव्या नोटेवर हम्पी येथील रथ तर १० रु.च्या नोटेवर कोणार्क मंदिर आहे. यापूर्वीही रु.२० च्या नोटेवर कोणार्क मंदिरातील रथचक्र तर ५० रु.च्या नोटेवर संसद भवन होते.


नव्या १०० रु. नोतेवरील राणी कि बाव गुर्जर स्थापत्य शैलीच्या अनोखा नमुना आहे. तिचा संबंध सरस्वती नदीशी आहे. ११ व्या शतकात राजाच्या साम्रानार्थ हि विहीर बांधली गेली ती सात मजली आहे. भूमिगत जलसंसाधन आणि जलसाठा प्रणालीचा हा अद्भुत नमुना आहे. अश्या प्रकारच्या विहिरी ३ रया शतकापासून बांधल्या जात होत्या. पाणी हे पवित्र आहे हे दर्शविण्यासाठी ही विहीर मंदिर स्वरुपात बांधली गेली आहे. प्रत्येक मजल्यावरील खांबांवर अप्रतिम कोरीव कामाच्या अनके मूर्ती असून त्यातील ५०० मोठ्या तर १ हजाराहून अधिक लहान आकाराच्या आहेत. त्यात विष्णू अवताराच्या प्रतिमा अधिक आहेत.

Leave a Comment