अपोलो चान्द्रवीरांसाठी लिहिला गेला होता शोकसंदेश


अमेरिकेच्या अपोलो चंद्रयानातून माणूस चंद्रावर उतरला त्याला २० जुलै रोजी ६९ वर्षे पूर्ण झाली. चंद्रावर माणूस उतरविण्यासाठी राबविल्या गेलेल्या मोहिमात अपोलो ११ हे एकमेव यशस्वी मिशन आहे. विशेष म्हणजे हे मिशन यशस्वी होईल आणि चंद्रावर गेलेले अंतराळवीर सुखरूप परत येतील अशी कुणालाच आशा नव्हती. अगदी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष निक्सन आणि अंतराळ संस्था नासा यानाही. त्यामुळे मिशन सुरु झाले तेव्हाच व्हाईट हाउससाठी भाषणे लिहिणारे रायटर बिल सफायर यांनी शोक्संदेशाचे भाषण लिहून तयार ठेवले होते मात्र सुदैवाने ते वाचायची वेळ आली नाही.

१६ जुलै रोजी सुरु झालेल्या अपोलो ११ मोहिमेत २० जुलैला नील आर्मस्ट्रोन्ग, एडविन ऑल्ड्रीन चंद्रावर उतरले तर मायकेल कोलिन्स यानातच थांबले होते. २४ जुलैला ते पृथ्वीवर सुखरूप परतले. नासाने सुरु केलेल्या अपोलो कार्यक्रमादरम्यान अमेरिकेत चार राष्ट्रपती बदलले. त्यातील निक्सन याच्या काळात हि मोहीम यशस्वी झाली. १९६० च्या दशकाअखेरी मानव चंद्रावर उतरेल असे केनेडी म्हणाले होते त्यामुळे हि मोहीम त्यानाच समर्पित करण्यात आली.

ही मोहीम यशस्वी होणार नाही आणि अंतराळवीर सुखरूप पृथ्वीवर येणार नाहीत अशी भीती असल्याने तयार केलेल्या शोकसंदेशात असे म्हटले गेले होते, चंद्रावर शांतीच्या शोधासाठी हे अंतराळवीर गेले होते आणि आता ते तिथेच शांतीत राहिले आहेत. हा बहादुरानी ही कुर्बानी जाणून बुजून दिली आहे आणि ती मानवतेसाठीची उमेद जागविणारी आहे. त्यांचा परिवार, मित्रच नाही तर देशही त्यांना श्रद्धांजली देत आहे. जेव्हा जेव्हा जगातून कुणीही चंद्राकडे पाहील तेव्हा तेव्हा माणुसकी जिवंत असलेले कुणीतरी चंद्रावर आहे याची त्यांना आठवण येईल.

Leave a Comment