अमेझोनला रोखण्यासाठी वॉलमार्ट मायक्रोसॉफ्टची हातमिळवणी


जगभरात ऑनलाईन शॉपिंग व्यवसायात नंबर वन वर असलेल्या अमेझोनशी स्पर्धा करणे कोणत्याच कंपनीला सोपे जाणार नाही हे लक्षात आल्यानंतर रिटेल मार्केटिंग मधील अग्रणी वॉलमार्ट आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज मायक्रोसॉफ्ट यांनी हातमिळवणी केली असून त्याचा मुख्य फोकस ऑनलाईन मार्केटिंग वर आहे. या क्षेत्रात आर्टीफीशीअल इंटेलीजन्स सह सर्व नवी तंत्रे आणि टूल्सचा चांगला वापर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे व्यवसाय खर्च कमी होण्याबरोबर व्यवसाय विस्तार वेगाने होऊ शकणार आहे

वॉलमार्टचे सीइओ डग मॅकमिलन म्हणाले जगभरातील ग्राहकांसाठी ऑनलाईन शॉपिंग आणखी सोपे करण्याचा आमचा प्रयत्न राहील. त्यासाठी मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड कम्प्युटिंग प्लॅटफॉर्मचा उपयोग होऊ शकणार आहे. यामुळे कंपनीच्या रेफ्रीजरेटर, एअरकंडीशनिंग प्रोसेस पासून सप्लाय चेन, वाहतूक चांगल्या पद्धतीने मॅनेज करणे शक्य होणार आहे. मायक्रोसॉफ्टचे सीइओ सत्या नडेला यांनीही वॉलमार्ट बरोबर करार झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे.

Leave a Comment