थायलंडच्या चाओमाई मंदिराचे हे आहे वेगळेपण


भारताप्रमाणे आशियातील अनेक देशात विविध देवतांची मंदिरे आहेत. तेथे नेमाने पूजा अर्चा होत असतात. आपल्या येथिल भाविकांप्रमाणे तेथील भाविकही देवाला नवस बोलतात, ते फेडतात आणि आपली इच्छा अमुक देवाने कशी पूर्ण केली याच्या रम्य कथाही सांगतात. राजधानी बँकॉक येथे असेच एक मंदिर असून हे मंदिर येथे बोलल्या जात असलेल्या नवसामुळे जगात प्रसिद्ध आहे.

हे मंदिर चाओमाईचे मंदिर म्हणून प्रसिद्ध असून हि देवी प्रजनन शक्तीची देवी मानली जाते. बुद्धपूर्व काळात हि वृक्षदेवी मानली जात होती. स्लोंग नदीच्या काठी हे छोटेसे मंदिर असून दरवर्षी येथे लाखो भाविक येतात त्यात थायलंड मधल्या भाविकांप्रमाणे पूर्व आशिया देशातील भाविक मोठ्या संख्येने असतात.

असा समज आहे कि हि देवी अपत्यहीन महिलांना मातृत्व देते. त्यासाठी तिला लाकडी लिंग वाहिली जातात. येथे पुरुषांना प्रवेश नाही. फक्त महिलाच आत जाऊ शकतात. या मंदिराच्या परिसरात अक्षरशः हजारोंच्या संखेने लहान, मोठ्या आकाराची लाकडी लिंगे आहेत. या कारणाने या मंदिराची प्रसिद्धी जगात पसरली आहे.

Leave a Comment