शिमल्याला जाताय, मग बुक कॅफेला नक्की भेट द्या


हिमाचलची राजधानी शिमला पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे आणि येथे नेहमीचा मोठ्या संख्येने प्रवासी येत असतात. विविध ठिकाणांना भेटी देताना येथील रेस्टॉरंट मधील विविध पदार्थांचा आस्वाद घेणे ओघाने आलेच. तुम्हीहि शिमल्याला जायचा बेत करत असाल तर या भेटीत टाका बेंच वरील बुक कॅफेला आवर्जून भेट द्या. येथे विविध चवदार पदार्थांबरोबर तुमच्याशी संवाद साधण्यासाठी कुणीतरी वाट पाहत आहे. हे रेस्टॉरंट तुरुंगातील कैदी लोकांकडून चालविले जात असून हे कैदी खुल्या कारागृहातील आहेत.


हिमाचल प्रदेश तुरुंग महासंचालक सोमेश गोयल यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम आकाराला आला आहे. येथे तुम्हाला उत्तम दर्जाची चहा, कॉफी आणि पदार्थ मिळतील तसेच वाचायला पुस्तकेही मिळतील. गेली दोन वर्षे १३५ कैदी मिळून हे रेस्टॉरंट चालवीत असून गेल्या वर्षात त्यांनी ३.५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. त्यांच्याकडून फूडव्हॅन सेवाही दिली जाते आणि त्याला खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.

रेस्टॉरंट मध्ये येणारे विद्यार्थी, ग्राहक याच्याशी येथे काम करणारे कैदी संवाद साधतात आणि त्यातून त्यांना भविष्य अधिक चांगले बनविण्याची उर्मी मिळते. त्यांच्या विचारात सकारात्मक बदल होतो असा अनुभव आहे. या रेस्टॉरंटच्या फूडव्हॅन मधील पदार्थांना पुणे, बंगलोर अश्या ठिकाणाहूनही चांगली मागणी आहे असे समजते.

Leave a Comment