निकॉनने आणला जगातील सर्वात मोठा’ ऑप्टिकल झुम लेन्सवाला कॅमेरा


जगातील सर्वात मोठी ऑप्टिकल झुम लेन्स असलेला कुलपिक्स पी१००० कॅमेरा ऑप्टिकस् आणि इमॅजिनिंग वस्तूचा निर्माता निकॉनने लॉन्च केला असून या कॅमेऱ्याची ऑप्टिकल लेन्स 125x ऑप्टीकल झुम म्हणजेच 24-300 mm लेन्सच्या बरोबरीत आहे.

९९९ डॉलर एवढी निकॉन कुलपिक्स पी१००० ची किंमत असून हा कॅमेरा अजून तरी भारतात लॉन्च करण्यात आलेला नाही. दरम्यान भारतात या आधीच्या कुलपिक्स पी९०० या कॅमेराला पसंती मिळाली होती. त्यामुळे भारतात देखील लवकरच कुलपिक्स पी१००० लॉन्च केला जाऊ शकता.

निकॉन कुलपिक्स पी१००० मध्ये 125x ऑप्टीकल झुम, मॅक्झिमम रेझ्युलेशन 16 मेगापिक्सलस्, 5.0 स्टॉप हायर शटर स्पीड, वाईड व्ह्युईंग अँगल 3.2 इंच टीएफटी एलसीडी मॉनिटर, 4k अल्ट्रा एचडी व्हिडीओ, रॉ फाईल्स स्पोर्ट असे फिचर्स देण्यात आले आहेत.

Leave a Comment