भरमसाठ सूट मिळाल्याने या मेड इन इंडिया बाइकची झाली झटपट बुकिंग


लॉंचिंगच्या केवळ १५ दिवसांमध्येच कावासाकी इंडियाची भारतात असेंबल होणारी निंजा झेडएक्स १० आर ही बाइक आउट ऑफ स्टॉक झाली आहे. भारतीय बाजारात कावासाकीने झेडएक्स १० आरचे दोन व्हेरियंट्स, निंजा झेडएक्स १० आर आणि झेडएक्स १० आर आर सादर केले होते. झेडएक्स १० आर बाइकच्या किंमती भारतात असेंबल झाल्याने ५ ते ६ लाखांनी कमी झाल्यामुळे या गाडीच्या लॉंचिंगच्या १५ दिवसांमध्येच जवळपास १०० युनिट्सची बुकिंग झाली आहे. पुढील काही महिन्यांमध्ये गाडीची डिलिव्हरी सुरू होईल.

कावासाकी झेडएक्स १० आरला यापूर्वी पूर्णतः इंपोर्ट केले जात होते, या बाइकची एक्स-शोरूम किंमत त्यावेळी १८.८ लाख रुपये होती आणि ऑन रोड किंमत २२ ते २३ लाख रुपयांपर्यंत असायची. पण आता भारतात असेंबल होत असल्यामुळे कावासाकी निंजा झेडएक्स १० आरची किंमत १२.८ लाख रुपये झाली आहे. तर कावासाकी निंजा झेडएक्स १० आर आरसाठी १६.१० लाख रुपये द्यावे लागतील.

या बाइकची झटपट बुकिंग भरमसाठ सूट मिळाल्याने झाली. भारतात असेंबल झाल्याने बाइकवर लागणारी इंपोर्ट ड्युटीची बचत होते आणि त्याचा थेट फायदा हा ग्राहकाला भेटतो. जगभरात कावासाकी झेडएक्स १० आर बाइकचे तीन व्हेरियंट्सची विक्री होते. कावासाकी झेडएक्स १० आर आणि झेडएक्स १० आर आर बाइक्समध्ये ट्रॅक्शन कंट्रोल, क्विक शिफ्टर, कॉर्नर मॅनेजमेंट फंक्शन, इत्यादी देण्यात आले आहेत.

Leave a Comment