आजपासून याहू मेसेंजरचे शट डाऊन


अखेर आजपासून याहू मेसेंजर शट डाऊन झाले असून ०५ ऑगस्ट २०१६ रोजी याहू मेसेंजरचे जुने व्हर्जन बंद करण्यात आले. त्यांनतर १७ जूलै २०१७ पासून आलेले नवीन व्हर्जन अखेर बंद करण्यात आले. जवळपास २० वर्षानंतर याहू मेसेंजर अखेर बंद करावे लागत आहे. याहूने ८ मार्च १९९८ रोजी याहू पेजेर जाहीर केले आणि त्यानंतर १९९९ मध्ये त्याचे नाव बदलून याहू मेसेंजर करण्यात आले होते.

पहिले रिअल टाईम कम्युनिकेशन प्लॅटफार्म म्हणून याहू मेसेंजरची ओळख होती. ज्यातून फोटो आणि सध्या चालू असलेल्या घडामोडी पाठवता येऊ शकत होते. याहूने गेल्या उन्हाळ्यात त्यांचा व्यवसाय वेरिझोनला ४.५ बिलिअन डॉलर्सला विकला. १७ जुलैपासून याहू मेसेंजर युझर्सना त्याची सर्व्हिस चॅट्सदेखील वापरता येणार नाही. नवीन स्क्युरल सर्व्हिस ग्रुप चॅटसाठी याहू मेसेंजर युझर्सना वापरता येईल. या अॅपवर सध्या फक्त आमंत्रण करता येत आहे. जे आधीपासून या अॅपवरती आहेत ते इतरांना चॅटसाठी आमंत्रण करु शकता.

ग्रुप चॅटसाठी याहूने बेटा टेस्टिंग स्क्युरल ग्रुप चॅट ही सर्व्हिस मेपासून आणली आहे. याहू स्क्युरल ग्रुप चॅट हे अॅप्लिकेशन अॅन्ड्राईड आणि आयओएस युझर्ससाठी उपलब्ध असणार आहे. याहू मेसेंजर युझर्सना जर त्यांची आतापर्यंतची चॅटींग पाहिजे असेल तर त्यांना एका प्रोसेसमधून जावे लागेल.

Leave a Comment