आता अॅस्टीन मार्टिनची फ्लाइंग कार सादर


ब्रिटनचा रोल्स रॉयस या लग्झरी ब्रांड प्रमाणेच जेम्स बॉंडची खास कार असा उल्लेख केल्या जाणाऱ्या ब्रिटनच्याच अॅस्टीन मार्टिन कंपनीने व्होलंट व्हिजन कन्सेप्ट कार पेश केली आहे. फ्लाइंग कार कन्सेप्टचे कंपनीचे हे पहिलेच मॉडेल असून क्रॅनफिल्ड विद्यापीठ, क्रॅनफिल्ड एअरोस्पेस सोल्युशन व रोल्स रॉयास याच्या भागीदारीत हे मॉडेल तयार केले गेले आहे.

ही कार बनविण्यामागे कंपनीचा उद्देश लग्झरी पर्सनल ट्रान्सपोर्टशन असाच आहे. या कारमध्ये तीन प्रवासी प्रवास करू शकतात. हायब्रीड इलेक्ट्रिक तंत्रज्ञानाचा वापर त्यासाठी केला गेला आहे. रोल्स रॉयस हाय परफॉरमन्स हायब्रीड इलेक्ट्रिक तंत्रज्ञान देणार आहे. हि कार मरेक रिचमन यांनी तयार केली असून त्यांनी अॅस्टीन मार्टिन डीबी ११, नवी व्हेंटेज, डीबीएस सुपरलेगेरा व अॅस्टीन मार्टिन व्हलकॅरी या कार तयार केलेल्या आहेत.

Leave a Comment