१००० वर्षे जुन्या सोन्याच्या मूर्तीने शास्त्रज्ञांनाही टाकले बुचकळ्यात


चीनमधील शास्त्रज्ञांनाही ३० वर्षांपूर्वी आढळलेल्या सोन्याच्या १००० वर्षे जुन्या मूर्तीने बुचकळ्यात टाकले असून या मूर्तीला शास्त्रज्ञांनी संवर्धनादरम्यान जेव्हा स्कॅन केले, तेव्हा अनेक धक्कादायक बाबी त्यांना दिसून आल्या. आत त्यांना एक ममी दिसली. एकदम मूर्तीच्याच आकाराची ही ममी होती. संशोधानात कळले की, हा एक बौद्ध भिक्षु होते, उपवासादरम्यान ज्यांनी ध्यानाच्याच अवस्थेत प्राणत्याग केला होता.

ही मूर्ती १९९०मध्ये देखभालीसाठी काढण्यात आली होती. पण या ममीला स्टॅचूच्या आतून काढण्यात आले नाही, कारण यामुळे ती मोडण्याचा धोका होता. या मूर्तीवर इटली, जर्मनी आणि नेदरलँडच्या शास्त्रज्ञांनी मिळून संशोधन सुरू केल्यावर सिटी स्कॅनमध्ये या मूर्तीत एका व्यक्तीला प्रिझर्व्ह करून ठेवल्याची बाब समोर आली. बौद्ध भिक्षुची ही ममी होती, त्यांची स्किन, मसल्स आणि हाडेही सुरक्षित होती. पण जेव्हा एंडोस्कोपीच्या माध्यमातून बौद्ध भिक्षुच्या शरीरातील सॅम्पल घेण्यात आले, तेव्हा कळले की, त्यांचे सर्व अवयव काढून टाकण्यात आले होते. त्यांच्या शरीरात कागद भरून ठेवण्यात आला होता.

बौद्ध भिक्षु लिकुआन यांची ही ममी होती, जे चायनीज मेडिटेशन स्कूलचे मेंबर होते. बौद्ध भिक्षूंच्या काही प्राचीन नोंदींवरून कळले की, बौद्ध भिक्षु मृत्यूपर्यंत उपवास ठेवायचे आणि स्वत:ला स्वेच्छेने ममीमध्ये परिवर्तित करायचे. या प्रकारचा उपवास सुरू करणारे लिकुआन बौद्ध भिक्षूंमध्ये पहिले व्यक्ती होते. उपवासासाठी त्यांनी तब्बल १२०० वर्षांपूर्वी स्वत:ला गुफेत कैद केले होते आणि प्राणायामाच्या अवस्थेत ध्यानात लीन झाले होते. या समाधीअवस्थेतच बौद्ध भिक्षुंना ममीफाइड करण्यात आले असावे.

याबाबत इतिहासकारांच्या मते, चीनमध्ये बौद्ध भिक्षुंच्या शरीर त्यागानंतर त्यांना पूजले जाऊ लागले आणि प्रिझर्व्ह करून ठेवलेल्या शरीराला मॉनेस्ट्रीमध्ये ठेवण्यात आले. जेव्हा २०० वर्षांनंतर त्यांचे ममीफाइड करण्यात आलेले अवशेष खराब होऊ लागले, तेव्हा त्याला सोन्याच्या मूर्तीमध्ये बदलण्यात आले. ही मूर्ती सध्या बुडापेस्टच्या नॅचरल हिस्ट्री म्यूजियममध्ये ठेवण्यात आली आहे.

Leave a Comment