एसबीआयच्या या अॅपमध्ये मिळतील ६० प्रकारच्या सुविधा


मुंबई – नेहमीच आपल्या ग्राहकांना चांगल्या आणि नवीन सुविधा देण्याच्या प्रयत्नात देशातील सर्वांत मोठी सरकारी बँक एसबीआय (स्टेट बँक ऑफ इंडिया) असते. एसबीआयने काही दिवसांपूर्वीच एक नवीन अॅप लॉन्च केले आहे. या अॅपचे नाव योनो (यू ओनली नीड वन) असे असून यामध्ये सामान्य नागरिकांना उपयुक्त असणाऱ्या गोष्टींचा समावेश आहे.

तुम्ही या अॅपद्वारे ६० महत्वपूर्ण कामे एकाच ठिकाणी करू शकता. त्यामुळे मोबाईलमध्ये आता ६० वेगवेगळे अॅप इंस्टॉल करण्यापेक्षा एसबीआयचे एकच अॅप इंस्टॉल केल्याने मोबाईलची मेमरी फुल होणार नाही. तुम्ही या अॅपमधून उबर, ओलासारख्या कॅबचे बुकिंग करू शकता. तसेच जबॉंग, मिंत्रा यासारखे ऑनलाईन शॉपिंगचे अॅप्स पण येथे उपलब्ध आहेत.

१४ वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये तुम्ही पुस्तक, कॅब, बुक करू शकता. त्याचसोबत मनोरंजन, विविध खाद्य पदार्थ, ट्रॅव्हलिंग आणि मेडिकल सुविधाही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या सगळ्या सुविधा तुम्हाला एकाच अॅपमध्य मिळाव्या यासाठी एसबीआयने ६० ई-कॉमर्स कंपन्यांसोबत करारही केला आहे. ज्यामध्ये अमेझॉन, उबर, शॉपर स्टॉप थॉमस कुक इ. कंपन्यांचा समावेश आहे.

तुम्हाला जर एसबीआयचे हे योनो अॅप वापरायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला हे अॅप डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर एका वर्षाच्या आत केवायसी (KYC -नो योर कस्टमर) साठी बँकेत जावे लागेल. ऑनलाईन शॉपिंग जे लोक करतात त्यांच्यासाठी हे अॅप खरेच उपयुक्त ठरणार आहे. कारण एका अॅपमध्ये एवढे सगळे अॅप मिळणे हे त्यांच्यासाठी संपूर्ण जेवण एकाच ताटात मिळण्यासारखे आहे.

Leave a Comment