भारतात शाओमीच्या तुलनेत आयफोनचा खप कमी


मुंबई – अॅपल कंपनीच्या आयफोनचे नाव नेहमीच स्मार्टफोनच्या यादीत सर्वात वर असते. पण आयफोनची भारतात पहिल्या सहा महिन्यात विक्री ही २.५ टक्के एवढी झाली आहे. म्हणजेच १० लाखांपेक्षाही कमी झाली आहे. तर गेल्या पूर्ण वर्षात ३० लाखांहून अधिक खप होता. या तुलनेत आतापर्यंत झालेल्या आयफोनची विक्री ही खूपच कमी आहे.

भारत हा आयफोनच्या विक्रीसाठी चीन इतकीच मोठी बाजारपेठ तयार करू शकतो. आयफोनच्या विक्रीवर परिणाम करण्यात मुख्यतः शाओमीचे मोबाईल फोन कारणीभूत ठरले आहेत. आयफोनच्या तुलनेपेक्षा शाओमीचे फोन स्वस्त आहेत. त्याचा परिणाम आयफोनच्या विक्रीवर झाला असल्याचे अॅपल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी म्हटले आहे.

आयफोन खरेदी करताना भारतातील ग्राहक सेकंड हॅण्ड फोन घेण्यास पसंती दर्शवतात आणि विक्रीवर याचाही परिणाम होत आहे. अॅपलने हा परिणाम रोखण्यासाठी आयफोन एसई आणि आयफोन ६ एस यांचे उत्पादनदेखील सुरू केले असल्यामुळे ग्राहकांचा आयात कर वाचू शकतो आणि आयफोनची विक्री जास्त होण्यास मदत होऊ शकते.

Leave a Comment