प्लास्टिक बाटल्या विल्हेवाटीसाठी रेल्वे स्थानकावर मशीन बसणार


पाण्याच्या प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या फेकून दिल्यामुळे वाढत जाणारा कचरा आणि प्रदूषण याला आळा घालण्यासाठी भारतीय रेल्वे देशातील २ हजार स्थानकांवर पहिल्या टप्प्यात बाटल्या नष्ट करणारी मशीन बसविणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. रेल्वे रुळांवर दररोज अश्या रिकाम्या असंख्य बाटल्या फेकल्या जातात आणि त्यातून ६२८९ टन कचरा निर्माण होतो असा अहवाल कॅगने दिला आहे.

यासाठी रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म तसेच स्थानकाच्या बाहेर पाडण्यासाठी असलेल्या गेटवर बाटली क्रशर मशीन बसविणार आहे. यात रिकाम्या बाटल्या टाकल्या कि हे मशीन सुरु होईल आणि बाटलीचे लहान लहान तुकडे केले जातील. नंतर हे तुकडे रिसायकलसाठी प्लास्टिक उद्योगांकडे पाठविले जाणार आहेत असे समजते. सध्या या बाटल्या हाताने नष्ट केल्या जातात.

छोट्या स्थानकांवर कार्पोरेट सोशल रीस्पॉन्सीबिलीटी खाली अशी मशीन बसविली जातील तर मोठ्या स्थानकांवर त्यासाठी निविदा काढून निर्णय घेतला जाणार आहे असेही समजते. टप्प्याटप्प्याने देशातील सर्व स्थानकांवर अशी मशीन बसविली जाणार आहेत.

Leave a Comment