स्वीस बँकेत पडून असलेल्या पैशांना मागील ३ वर्षांपासून कोणीच दावेदार नाही


नवी दिल्ली – भारतात सध्या स्वित्झर्लंडमधील बँकांमध्ये असलेल्या काळ्य़ा पैशावरुन महाभारत सुरू असतानाच याप्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बऱ्याच भारतीय खात्यांना मागील ३ वर्षांपासून कोणीच दावेदार समोर आलेला नाही.

निष्क्रिय असलेल्या भारतीय खात्यांची यादी स्वित्झर्लंडमधील बँकांनी जाहिर केली आहे. पण या खात्यांवर ३ वर्षानंतरही कोणीच दावा सांगितलेला नाही. स्वीस बँकेतील काळ्या पैशावरुन भारतात सध्या मोठे राजकारण सुरू असल्यामुळे कोणीही खातेदार पुढे यायला तयार होत नाही. दरम्यान, २०१७ या वर्षात भारतीयांनी स्वीस बँकेत निनावी ७ हजार कोटी रुपये जमा केले आहेत. यापूर्वी २०१५ मध्ये देखील स्वीस बँकेने निष्क्रिय खात्यांची नावे जाहिर केली होती. यामध्ये स्वित्झर्लंडच्या नागरिकांसह काही भारतीय खातेदारांचा समावेश होता. मात्र, या खात्यांवरही कोणत्याही खातेदाराने अद्याप दावा सांगितलेला नाही.

Leave a Comment