जॅक मा ला मागे टाकत मुकेश अंबानी बनले आशियातील श्रीमंत


रिलायंस इंडस्ट्रीज च्या मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी आशियातील सर्वात श्रीमंत बनण्याची कामगिरी केली असून त्यांनी चीनी कंपनी अलिबाबाचा संस्थापक जॅक मा याला मागे टाकून हे स्थान पटकावले. शुक्रवाई रिलायंसच्या शेअर मध्ये झालेल्या भरीव वाढीमुळे अंबानी यांची संपत्ती ४४.३ अब्ज डॉलर्सवर पोहोचली तर जॅक मा याची संपत्ती ४४ अब्जावर राहिली. ब्लुमबर्ग बिलेनिअर इंडेक्सने गुरुवारी अमेरिकन शेअर बाजार बंद झाल्यावर मुकेश अंबानी आशियातील सर्वाधिक श्रीमंत बनल्याचे जाहीर केले. हा इंडेक्स जगातील ५०० अब्जाधीशांचे रोजचे रँकिंग जाहीर करतो आणि त्यासाठी अमेरिकन शेअर बाजाराची आकडेवारी ग्राह्य धरली जाते.

रिलायंसने गुरुवारी १०० अब्ज डॉलर्स कंपनी बनविण्याची कामगिरी बाजावरी. शुक्रवारी त्याचा परिणाम कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्यात झाला आणि कंपनीची मार्केट कॅप ७ लाख कोटींच्या पलीकडे गेली. गिगा फायबर आणि जिओ फोन २ च्या घोषणेनंतर रिलायंसचा शेअर वाढायला सुरवात झाली होती आणि ६ जुलै पासून त्यात १४ टक्के वाढ नोंदविली गेली.

आशियातील सर्वाधिक श्रींमंत यादीत भारताचे मुकेश अंबानी एकमेव असून त्याखालोखाल जॅक मा, पोनी मा, हुई का यान, यांग हुआ असे सर्व चीनी आहेत.

Leave a Comment