‘फेसिअल रिकग्निशन टेक्नॉलॉजी’चा गैरवापर मोठ्या प्रमाणावर; मायक्रोसॉफ्टची धोक्याची घंटा


न्यूर्याक – आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टने फेसिअल रिकग्निशन टेक्नॉलॉजी अर्थात चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाबाबत धोक्याची घंटा बजावली असून सरकारने या तंत्रज्ञानाच्या वापरावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा नागरिकांच्या सार्वजनिक जीवन मुक्तपणे जगण्याच्या हक्कांवर बंधने येऊ शकते, असे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे.

अमेरिकन काँग्रेसला यासंदर्भात अभ्यास करण्याचे कंपनीचे अध्यक्ष बी.स्मिथ यांनी सुचविले आहे. आपण कायद्याच्या राज्यात राहत असल्यामुळे फेसिअल रिकग्निशन टेक्नॉलॉजी वापरावर सरकारने नियंत्रण ठेवायला हवे. सध्या मोठ्या प्रमाणावर ‘फेसिअल रिकग्निशन टेक्नॉलॉजी’चा गैरवापर वाढीस लागला आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून व्यक्तीच्या परवानगीविना तिचा फोटो किंवा व्हिडिओवरून ओळख पटविली जाऊ शकते. सध्या या तंत्रज्ञानाचा वापर गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी केला जात आहे.

लोक सार्वजनिक कार्यक्रमात तसेच निदर्शनावेळी मोठ्या प्रमाणावर एकत्र येतात. नागरिकांची ओळख पटविण्यासाठी त्यावेळी ‘फेसिअल रिकग्निशन टेक्नॉलॉजी’चा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे या माहितीचा गैरवापर केला जाण्याची शक्यता दाट आहे. अशाप्रकारे फेसबुकवरील माहितीचा गैरवापर करण्यात आला होता.

Leave a Comment