डास चावल्याने सतत खाज सुटत असल्यास करा हे उपाय


पावसाळ्याच्या दिवसांत दासांचा प्रादुर्भाव खास वाढलेला दिसतो. चावणारे डास आपल्याला दिसले, तर आपण ते पळवितो ही, पण अनेकदा तीनचार वेळेला डास चावल्यावरच आजूबाजूला डास असल्याचे आपल्याला कळते. डास चावल्यानंतर अंगावर आलेले पुरळ किंवा फोड लाल दिसत असून, हे अतिशय खाजरे असतात. डास चावल्यानन्तर खाज सुटते? तज्ञ म्हणतात, की डास जेव्हा डंख मारून आपल्या शरीरातील रक्त शोषित असतो, तेव्हा त्या डंखातील स्राव आपल्या त्वचेमध्ये अवशोषित होतो. ह्या स्रावातील प्रथिने आपले रक्त साकळू (clot) देत नाहीत, त्यामुळे रक्त शोषणे डासांना सहज शक्य होते. त्यानंतर जेव्हा डास उडून जातो, तेव्हा त्याच्या स्रावातील प्रथिनांपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी शरीरातील ‘हिस्टमाईन’ नामक रसायन कार्यान्वित केले जाते. हे रसायन आपल्याला कोणत्या प्रकारची जखम झाली असता, किंवा कुठलीही अॅलर्जी उद्भाविली असता कार्यान्वित होते. ह्याच रसायनामुळे त्वचेला खाज सुटू लागते.

जर डास चावून अंगाला खाज सुटू लागली, तर काही उपाय अवलंबल्याने ही खाज पुष्कळ प्रमाणात कमी करता येते. सर्वात महत्वाचे म्हणजे जर डासांचा प्रादुर्भाव झाला असता, उत्तम ‘डास प्रतिरोधी’, म्हणजेच रिपेलंट वापरणे आवश्यक आहे. तरीही डास चावून फोडही आले, आणि खाजही सुटू लागली, तर रबिंग अल्कोहोलचा वापर करावा. आजकाल बाजारामध्ये रबिंग अल्कोहोल वाइप्सही उपलब्ध आहेत, ते जवळ बाळगावे. ह्या अल्कोहोलच्या प्रभावामुळे डासाच्या सरावातील प्रथिने निष्क्रिय होतात.

डास चावले असता, त्या ठिकाणी आईस पॅकचाही वापर करता येईल. डास चावलेल्या ठिकाणी क्वचित किंचितशी सूजही येते. आईसपॅकचा वापर केल्याने ही सूज कमी होईल आणि खाज ही नाहीशी होईल. त्याचप्रमाणे कॅलामाईन लोशन लावल्यानेही त्वचेवरील खाज कमी होण्यास मदत होते. जर डास फारच जास्त चावले असतील, आणि सतत खूपच खाज सुटत असेल, तर एखादी सौम्य ‘अँटी हिस्टमाईन’ गोळी घ्यावी. मात्र ही गोळी घेण्याच्या आधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. खाण्याचा सोडा, किंवा बेकिंग सोडा थोड्याश्या पाण्यामध्ये कालवून त्याची पेस्ट डास चावलेल्या ठिकाणी लावल्यासही खाज कमी होऊन आलेले पुरळही नाहीसे होण्यास मदत होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment