हे आदिवासी एखादे बाळ थोडे जरी गोरे असले करतात त्याची हत्या


आजही अशी एक आदिवासी अंदमान निकोबारमध्ये जमात आहे जी ५५ वर्षे जुनी असून ती जरावा जमात या नावाने ओळखली जाते. परंपरेच्या नावाखाली येथे जमातीत लोक स्वतःच्या मुलालाच मारतात. एखादे बाळ जर काळ्या रंगाऐवजी थोडे जरी गोरे असले तरी परंपरेच्या नावाखाली आदिवासी लोक त्यांना मारतात. बाळ काळ्या रंगाऐवजी जर थोडेही गोरे असले तरी समुदयातील लोक त्याला मारतील अशी भिती आईला वाटत असते. ९० च्या दशकात हा समुदाय सर्वप्रथम जगासमोर आला होता. जगाशी संपर्क ठेवणे त्यांना आवडत नाही.

आफ्रिकी वंशाच्या या समुदयातील लोक प्रचंड काळे असतात. या समुदायाच्या परंपरेनुसार मुलांची आई विधवा झाली किंवा तिचा पती दुसऱ्या समुदायाचा असेल तर त्या मुलालाही मारले जाते. जराही बाळ गोरे असेल तर त्याचा वडील कोणी बाहेरचा व्यक्ती असल्याचे समजून त्याची हत्या केली जाते. यासाठी समुदायात दुसरी शिक्षाही नाही. या समुदायाबाबत अभ्यासक सांगतात की, बाळाचा जन्म झाला की, जरावा समुदायात सर्व महिला त्याला दूध पाजतात. त्यामुळे समुदायाचे पावित्र्य कायम राहते असे समजले जाते.

बाहेरच्या लोकांना या आदिवासींच्या भागात प्रवेश नसतो. हे लोक अंदमान ट्रंक रोडच्या जवळपास असलेल्या रहिवासी भागात राहतात. या समुदायाच्या महिलांबरोबर काही वर्षांपूर्वी काही पर्यटकांनी गैरव्यवहार केला होता, असे सांगितले जाते. त्यानंतर काही वर्षांनी २०१३मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या मार्गावरून पर्यटकांना बंदी घातली होती. नंतर या निर्णयात दुरुस्तीही केली होती.

रिपोर्ट्सनुसार केवळ ४०० लोक या समुदायातील शिल्लक असून असे समजले जात आहे की, आगामी दहा वर्षांत हा समुदाय पूर्णपणे लुप्त होऊ शकतो. कारण या भागातून एक महामार्ग तयार केला आहे. त्यामुळे या भागात लोकांची वर्दळ वाढली आहे. वन्य प्राणी खाऊन जरावा समुदायातील लोक उदरनिर्वाह करतात. ते हजारों हजारो वर्षांपासून असेच जगत आले आहेत. फळे आणि मधही ते खातात. तज्ज्ञांच्या मते या प्रजातीला १५० हून अधिक झाडे आणि ३५० हून अधिक जीव जंतूंबाबत माहिती असते. औषधीही ते स्वतः तयार करतात.

Leave a Comment