वृक्षारोपणात वेळ, खर्च आणि कष्टाची बचत करणारे बीज बॉम्ब


पावसाला सुरु झाला कि सर्वत्र वृशारोपण, वनीकरणाच्या मोहिमा सुरु होतात. जमिनीवर झाडांचे छात्र वाढवून प्रदूषण कमी करणे आणि पाऊसमान वाढविणे यासाठी हे आवश्यक आहे. मात्र त्यात वेळ. खर्च आणि कष्ट करावे लागतात. यावर एक नामी योजना राबविली जात असून मुळची जपानची वृक्षारोपणाची ही पद्धत आता येथेही वापरली जात आहे. सीड बॉम्ब किंवा बीज बॉम्ब असे याचे नाव आहे.

जबलपूरच्या गायत्री पीठातर्फे गेली काही वर्षे वृक्षारोपण कार्यक्रम राबविला जात आहे. नर्मदा नदी किनारा नी जंगले अधिक घनदाट होण्यासाठी हा कार्यक्रम केला जातो. मात्र यात दरवर्षी साधारण १५०० रोपे लावली जातात. कारण वेळ, खर्च आणि श्रम याचाही विचार करावा लागतो. या पीठातील युवा समन्वयक संतोष ताम्रकार यांनी नव्या तंत्राने वृक्षरोपण गती वाढविता येईल का याचा इन्टरनेटवर शोध घेतला तेव्हा त्यांना हि जपानी पद्धत सापडली. त्याचे अनुकरण करून त्यांनी हे बॉम्ब तयार केले. त्यामुळे दरवषी होणाऱ्या खर्चात नी तेवढ्याच वेळात आणि श्रमात १० हजार झाडे लावणे शक्य झाले आहे. त्यांनी कडूनिंब, जांभूळ, पारिजात, कापूस, सीताफळाचे सीड बॉम्ब तयार केले आहेत.


यामध्ये रोपे तयार करण्याची गरज राहत नाही. तसेच कुणीही कार, बस, रेल्वेतून जाताजाताहि जेथे लावणीयोग्य जागा दिसेल तेथे बिजरोपण करू शकतो. हे सीड बॉम्ब तयार करताना २/३ मती आणि १/३ जैविक खत मिसळून त्यात दोन बिया घालून गोळा तयार केला जातो. हा गोळा ६ तास उन्हात वाळविला जातो आणि नंतर सावलीत उघड्यावर ठेवला जातो. हा गोळा घट्ट झाला कि बॉम्ब तयार झाला. पावसाळा सुरु झाला कि हे बॉम्ब जंगलात, रस्त्याकडेला टाकले जातात. ते जमिनीत रुजतात. त्याच्या पोषणासाठी जैविक खत असतेच. त्यातून वृक्ष तयार होतात. जपान मध्ये अनेक वर्षे या पद्धतीने शेतीही केली जात आहे.