गुगलमध्ये काम करतात चक्क २०० बकऱ्या आणि पगारही घेतात


जाएंट सर्च इंजिन म्हणून ओळख असणाऱ्या गुगल कंपनीत आपण आजवर माणसे त्यानंतर मशीन्सही काम करत असल्याचे ऐकले आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का, याठिकाणी बकऱ्याही काम करतात. होय, हे खरे आहे. तुम्ही वाचले ते अगदी खरे आहे. तब्बल २०० बकऱ्या गुगलमध्ये काम करतात आणि त्या मोबदल्यात त्यांना गुगलकडून पगारही दिला जातो.

सर्वात आधी २००९मध्ये गूगलने याची सुरुवात केली होती. कंपनीने त्यावेळी २०० बकऱ्या कामावर ठेवल्या होत्या. गूगलप्लेक्स ऑफिसमध्ये तयार करण्यात आलेल्या पार्कमध्ये असलेले गवत त्या चारा म्हणून चरतील आणि त्यामुळे गवत ट्रिम होत राहील. गुगलच्या मते, गवत कापण्याच्या मशीनमुळे ध्वनी, वायू प्रदूषण होते. तसेच उर्जाही नष्ट होत असल्यामुळेच कंपनी बकऱ्यांना नोकरीवर ठेवते. याबाबतची माहिती स्वतः गुगलने दिलेली आहे.

या २०० बकऱ्या आठवड्यातून एकदा गुगलच्या मोठ्या लॉनवर सोडल्या जातात. त्या काही तासांतच सर्व लॉनवरील गवत खाऊन टाकतात. पण बकऱ्यांनी केवळ गवतच खावे यासाठी त्यांच्या गुराख्यांकरवी त्यांना खस ट्रेनिंगही दिले जाते. प्रत्येक बकरीचा पगारही दिला जातो. तो संबंधित एजन्सीमध्ये जमा होतो. त्याशिवाय बकऱ्यांच्या राहण्याची आणि खाण्याची व्यवस्थाही केली जाते. कॅलिफोर्नियानंतर आता गुगलच्या अनेक ऑफिसेसमध्ये या ‘गूगल गोट्स’ काम करतात. यापूर्वी २००७मध्ये याहूनेही त्यांच्या लॉनचे गवत कापण्यासाठी बकऱ्या ठेवल्या होत्या.

Leave a Comment