भारतातील पहिली इलेक्ट्रिक बाईक ट्राँक्स वन लाँच


भारतातील स्माट्राँक्स (smartron) ऑटो कंपनीने ट्राँक्स वन नावाने देशातील पहिली इलेक्ट्रिक बाईक लाँच केली असून हि सायकल कम बाईक आहे. एकदा चार्ज केल्यावर ती ४५ ते ५० किमी अंतर कापू शकते आणि तिची किंमत आहे ४९९९९ रुपये. या बाईकच्या आगावू नोंदणीला सुरवात झाली असून ती जुलैच्या १६ तारखेपासून ग्राहकाला मिळू शकणार आहे.

या बाईकला मल्टीपल राईड मोड असून तिचा वेग ताशी २५ किमी आहे. व्हर्चुअल गिअर सह तिला ३ इलेक्ट्रिक गिअर, ६ स्पीड शिमानो शिफ्टर्स दिले गेले आहेत यामुळे बाईकचा वेग अॅडजस्ट करणे शक्य होते. या बाईकच्या बॉडीसाठी विमान तयार करताना वापरण्यात येणाऱ्या धातूचा वापर केला गेला आहे त्यामुळे तिला गंज चढत नाही. ट्राँक्स एक्सतीएमचा स्मार्ट डिस्प्ले सह इंटिग्रेटेड बाईक मोबाईल अॅप मुले वेग दाखविण्याबरोबर फिटनेस लक्ष्य सेट करता येणार आहे.

या बाईकची बॅटरी रिप्लेस करता येते. थ्रोटल मोडवर प्रती चार्ज ५० किमी तर इलेक्ट्रोनिक मोडवर प्रतीचार्ज ७० ते ८५ किमी जाता येते असा कंपनीचा दावा आहे. मुंबई, गोवा, पुणे, दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई, बंगलोर, हैद्राबाद येथे कंपनीची सेवा केंद्रे आहेत.