इन्फिनिक्सचा हॉट प्रो सिक्स स्मार्टफोन


हाँगकाँगच्या इन्फिनिक्स मोबाईल उत्पादक कंपनीने बुधवारी नवा हॉट प्रो सिक्स हा बजेट स्मार्टफोन लाँच केला असून मोठा स्क्रीन आणि दमदार बॅटरी अशी त्याची खासियत आहे. किमतीच्या मानाने या फोनला दिलेली फिचर उत्तम प्रकारची आहेत. हा फोन ७९९९ रुपयात लवकरच फ्लिपकार्टवर उपलब्ध होत आहे.

या फोनला ५.९९ इंची फुल एचडी डिस्प्ले, ४ हजार एमएएचची बॅटरी, ३ जीबी रॅम, ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज ते मायक्रो कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा दिली गेली आहे. १३ एमपी आणि २ एमपीचा रिअर डूअल सेट कॅमेरा, सेल्फी साठी ५ एमपीचा कॅमेरा असून दोन्ही कॅमेरे फ्लॅश सह आहेत. अँड्राईड ८.० ओएस, फेस अनलॉक तसेच फिंगरप्रिंट सेन्सर, डूअल सीम, स्लिम बेजल अशी त्याची अन्य फिचर आहेत. रात्रीच्यावेळी आयकेअर फिचर ऑन करून डोळ्यांना रीलॅक्स मिळविण्याची सोय आहे..
सँडस्टोन ब्लॅक, मॅजिक गोल्ड, सिटी ब्लू, बोर्डएक्स रेड अश्या रंगात हा फोन उपलब्ध आहे. पीएचएक्स ब्राउझर हे या फोनचे खास वैशिष्ट असून त्यामुळे गुगल सर्च आणखी अॅडव्हांस बनविता येतो असा कंपनीचा दावा आहे.

Leave a Comment