भारत जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था


जागतिक बँकेने जाहीर केलेल्या २०१७ च्या आकडेवारीनुसार भारत फ्रांसला मागे टाकून जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. या आकडेवारीनुसार भारताचा जीडीपी २.५९७ ट्रीलियन डॉलर्स वर गेला सून फ्रांसचा जीडीपी २.५८२ ट्रीलीयन डॉलर्स आहे. जुलै २०१७ मध्ये दीर्घ काळ मंदी राहूनही भारताने हि कामगिरी बजावली आहे. भारताची लोकसंख्या १.३४ अब्ज आहे तर फ्रांसची लोकसंख्या ६७ कोटी आहे.

भारतात २०१६ नोव्हेंबर मध्ये केली गेलेली नोटबंदी आणि त्यानंतर लागू केला गेलेला जीएसटी यामुळे अर्थव्यवस्था सुस्तावली होती आणि मंदीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र त्यानंतर अर्थव्यवस्थेने वेग घेतल्याने जीडीपी वाढला असून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार यंदा हा जीडीपी ७.४ टक्क्याने वाढेल आणि २०१९ पर्यंत तो ७.८ पर्यंत पोहोचेल. सेंटर फॉर इकोनोमिक्स अँड बिझिनेस रिसर्च नुसार भारत ब्रिटनलाही मागे टाकून २०३२ पर्यंत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल असा अंदाज दिला गेला आहे. जगातील एक नंबर अर्थव्यवस्था अमेरिकेची असून त्याखालोखाल चीन, जपान, जर्मनी यांचा नंबर आहे.

Leave a Comment