किम कर्दाशिअनच्या सावत्र बहिणीने मार्क झकरबर्गलाही टाकले मागे


वयाच्या विसाव्या वर्षी मॉडेल, अभिनेत्री किम कर्दाशिअन हिची सावत्र बहिण केली जेनर ही अब्जाधीश झाली असून फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झकरबर्गलाही तिने मागे टाकले आहे. मार्क हा आतापर्यंत सर्वात कमी वयात अब्जाधीश झाला होता.

केली जेनर ही ‘केली कॉस्मेटिक्स’ या प्रसिद्ध सौंदर्यप्रसाधन कंपनीची सम्राज्ञी असून ही कंपनी ओठांना अधिक आकर्षक करण्यासाठीची सौंदर्यप्रसाधने तयार करते. विशेष म्हणजे स्वत: तिच्या ओठांसाठी केली प्रसिद्ध आहे. सध्याची केलीची संपत्ती ही ६१ अब्ज ७४ कोटींच्या घरात असल्याचे ‘फोर्ब्स’ने म्हटले आअसून तर केली कॉस्मेटिक्सचे एकूण बाजारमूल्य हे ५४ अब्जांच्या घरात आहे.

केलीने ही कंपनी दोन वर्षांपूर्वी सुरू केली होती. अर्थात ती किमची बहिण असल्याने प्रसिद्ध होतीच पण तिला या कंपनीने अधिक प्रसिद्धी मिळवून दिली. नुकतीच अमेरिकेतील ‘self-made US billionaire’ची यादी ‘फोर्ब्स’ने जाहीर केली. केली या यादीत १९ व्या स्थानावर आहे. तिच्या संपत्तीत पुढील काही वर्षांत आणखी वाढ होणार आहे. मार्क झकरबर्ग याआधी वयाच्या २३ व्या वर्षी अब्जाधीश झाला होता. त्यामुळे केलीने त्याचा विक्रम मोडला. पण ती self-made US billionaire’ असूच शकत नाही, तिचा जन्म गर्भश्रीमंत घरात झाला, तेव्हा तिला या स्थानी पोहोचायला इतरांच्या तुलनेत फार मेहनत घ्यावी लागली नाही अशा शब्दात तिच्यावर टीका करण्यात आली आहे.

Leave a Comment