बीएसएनएलने लाँच केली भारताची पहिली टेलिफोनी इंटरनेट सेवा


नवी दिल्ली – भारताची पहिली टेलिफोनी इंटरनेट सेवा ‘विंग’ भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) लाँच केली असून भारतात किंवा भारताबाहेर कुठेही बीएसएनएल ग्राहक इंटरनेटवरून कॉल करू किंवा उचलू शकतो.

मोबाईल नंबरींग स्किमचा वापर यासाठी करण्यात येणार आहे. शिवाय, ग्राहकांना एसआयपी क्लाईंट (सॉफ्ट अॅप) (लॅपटॉप, स्मार्टफोन, टॅबलेटवर ) डाऊनलोड आणि इन्स्टॉल करावे लागणार आहे. बीएसएनएलने आपल्या परिपत्रकात ग्राहकांना योग्य सुविधा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

दूरसंचार विभागाने हा निर्णय घेतला असून दूरसंचार आयोगाने कंपनीने अॅप आधारित कॉल सेवा सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. या सेवेसाठी नोंदणी या आठवड्यात सुरू होईल आणि सेवा २५ जुलै रोजी सक्रिय करणे सुरु होईल. काही प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की या सेवेसाठी दरवर्षी १०९९रुपये द्यावे लागतील. १०९९ रुपये भरल्यानंतर आपण व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल एका वर्षासाठी विनामूल्य करु शकता.

Leave a Comment