अस्तित्वात नसलेले ‘जिओ इन्स्टिट्युट’ उत्कृष्ट – यशवंत सिन्हा यांची सरकारवर टीका


नवी दिल्ली – केंद्र सरकारने रिलायन्स फाऊंडेशनच्या अद्याप अस्तित्वातही न आलेल्या जिओ इन्स्टिट्युटचा देशातील सहा उत्कृष्ट संस्थांमध्ये समावेश केल्याबद्दल विविध स्तरावरुन सरकारवर टीका होत असतानाच भाजप नेते यशवंत सिंहा यांनीही सरकारला घरचा आहेर दिला आहे.

केंद्रातील मोदी सरकारवर भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी टीकेची झोड उठवली आहे. अद्याप जिओ इन्स्टिट्युटची स्थापनाही नाही आणि त्याचे अस्तित्वही नाही. हाच मुकेश अंबानी असल्याचा फायदा असल्याचे उपरोधिक ट्विट यशवंत सिन्हा यांनी केले आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांना देशभरातील अनेक जणांनी जिओ इन्स्टिट्युटला उत्कृष्ट संस्थेचा दर्जा दिल्याबद्दल धारेवर धरले. या मुद्द्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवरुन सरकारवर टीका केली होती. यापूर्वी काँग्रेस सरकार अंबानींच्या खिशात होते, आता भाजप सरकार आहे, असे ट्विट केजरीवालांनी केले होते.