या जगामध्ये आहेत असे ही विश्वविक्रम !


आपण काही तरी वेगळे, हटके करावे, लोकांनी आपल्याला ओळखावे, असे प्रत्येकालाच कधी ना कधी वाटते, पण काहींच्या मनामध्ये काहीतरी जगावेगळे करून दाखविण्याची, त्यामुळे प्रसिद्धी मिळविण्याची इच्छा इतकी प्रबळ असते, की त्यासाठी ते काहीही करायला मागे पुढे पहात नाहीत. असे अनेक चित्र विचित्र, अविश्वसनीय विश्वविक्रम आजवर भारतातील अनेक लोकांनी केले आहेत.

एका व्यक्तीने झिप वायर ला आपल्या केसांच्या सहाय्याने लटकून वेगवान नदी ओलांडायचा विक्रम केला आहे. ह्या व्यक्तीचा हा कारनामा गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये ही विश्वविक्रम म्हणून नोंदलेला आहे. ज्या ठिकाणाहून खाली डोकावून पाहताना देखील भीतीने जीवाचा थरकाप उडेल अशा ठिकाणहून आपल्या केसांच्या बळावर, झिप वायरला लटकून फोफावत्या नदीचा प्रवाह पार करण्याचा विक्रम ह्या बहाद्दराने केला आहे. त्याचप्रमाणे जगातील सर्वात तिखट जातीची मिरची खाण्याचा विक्रमही भारतीयाच्याच नावावर नोंदलेला आहे. जगातील सर्वात जहाल जातीच्या म्हणून ओळखल्या जाणऱ्या मिरच्या खाणारी ही महिला एखाद्याने चवीने, ताव मारीत जेवण करावे इतक्या सहज ह्या मिरच्या खाते. मिरची कितीही तिखट असो, ही महिला ती मिरची अगदी सहज खाऊ शकते.

एका व्यक्तीने तर काहीतरी हटके करून दाखविण्यासाठी, टायपिंग करताना हाताची बोटे न वापरता चक्क आपल्या नाकाचा वापर केला. नाकाच्या सहाय्याने आपले नाव सर्वाधिक वेगाने टाईप करण्याचा विक्रम ह्या व्यक्तीच्या नावावर नोंदलेला आहे, तर भारतामध्ये जगातील सर्वात मोठ्या आकाराची पोळी बनविण्याचा विश्वविक्रमही केला गेला आहे. अजून एक विचित्र विक्रम म्हणजे, कानावरील केसांच्या लांबीचा. ऐकून विचित्र वाटले ना? हा ही विश्व विक्रम एका महाभागाने केलेला आहे. ह्या व्यक्तीच्या कानांवर असलेल्या केसांच्या लांबी इतके कानावरील केस जगामध्ये अन्यत्र कुठल्याही देशामध्ये आजवर आढळून आलेले नाहीत. केसाच्या प्रमाणे हाताच्या बोटांच्या नखांच्या सर्वाधिक लांबीचा विश्वविक्रमही एका भारतीयाच्या नावे नोंदलेला आहे.

नवे नवे विक्रम करण्याकरिता लोक काय शक्कल लढवितात, ह्याचे उदाहरण म्हणजे, एका दिवसामध्ये सर्वाधिक हस्तांदोलने करणे. एका व्यक्तीने केवळ इतरांशी हस्तांदोलने करीत एका दिवसामध्ये सर्वात जास्त हस्तांदोलने करण्याचा विक्रम केलेला आहे.

Leave a Comment