श्री रामायण एक्स्प्रेस नोव्हेंबरपासून धावणार


भगवान श्रीराम यांचे जेथे जेथे वास्तव्य झाले त्यातील महत्वाच्या ठिकाणांची सैर करण्याची संधी भारतीय रेल्वे उपलब्ध करून देत असून रामायण एक्स्प्रेस नावाने हि रेल्वे नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. रामाच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या ठिकाणांची ही १६ दिवसांची सफर आहे. मंगळवारी रेल्वे मंत्रालयाकडून या संदर्भातली घोषणा केली गेली.

आयआरटीसी कडून या ८०० सीट असलेल्या रेल्वेचे नियंत्रण केले जाणार आहे. दिल्लीच्या सफदरजंग स्टेशन पासून या गाडीचा प्रवास सुरु होईल तो तमिळनाडूतील रामेश्वरम येथे संपेल. ही सहल दोन भागात आहे. पहिले भारतातील काही ठिकाणे आणि श्रीलंकेतील काही ठिकाणे. श्रीलंकेत जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांना थोडे अधिक पैसे भरावे लागतील. यात भारत श्रीलंका विमान प्रवास अंतर्भूत आहे. या सहलीत जेवण, निवास आणि स्थळदर्शन यांची व्यवस्था केली जाणार आहे तसेच एक टूर मॅनेजर सोबत राहणार आहे.

भारतात अयोध्या, हनुमानगढी, रामकोट, कनकभवन मंदिर, जनकपुर, नंदीग्राम, सीतामढी, वाराणसी, प्रयाग, श्रीरंगवीरपूर, नाशिक, हम्पी आणि रामेश्वरम ही ठिकाणे आहेत तर श्रीलंकेत कॅन्डी, नुवारा, एलिया, कोलंबो, मेगाम्बो ही ठिकाणे आहेत. फक्त भारत यात्रेसाठी मनाशी ३९८०० तर श्रीलंकेसह यात्रेसाठी ४७६०० रु. द्यावे लागणार आहेत.

Leave a Comment