लहान मुलांची माती खाण्याची सवय सोडविण्यासाठी अवलंबा हे उपाय


लहान मुले मातीमध्ये खेळत असताना माती अतिशय चवीने खात असलेली आपण अनेकदा पहिले असेल. त्यांच्या ह्या सवयीने त्यांचे आईवडीलही बहुतेकवेळी हैराण झालेले दिसतात. माती खाण्याची सवय लहान मुलांच्या आरोग्याकरिता घातक ठरू शकते. ह्या सवयीमुळे मुलांच्या पोटामध्ये जंत होण्याची शक्यता असते. ही सवय सुटावी ह्याकरिता मुलांचे आई वडील अनेक उपाय अवलंबताना ही दिसतात. ह्यामध्ये लहान मुलांच्या हातांची बोटे चक्क चिकटपट्टीने बांधून ठेवणे इथपासून ते निरनिराळे औषधोपचार केले जाताना पाहावयास मिळतात. ही सवय सोडविण्यासाठी काही घरगुती उपायांचा अवलंब करता येऊ शकेल.

मुलांच्या मनातील माती खाण्याची इच्छा कमी करण्यासाठी लवंगेचे पाणी हा उपय अतिशय प्रभावी मनाला गेला आहे. ह्या साठी काही लवंग पाण्यामध्ये टाकून हे पाणी उकळून घ्यावे. हे पाणी दिवसातून तीन चार वेळेला एक एक चमचा मुलाला पाजावे. ह्या उपायाने काही दिवसातच फरक दिसून येईल. मुलांच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असणे, ही माती खाण्याच्या सवयीसाठी मुख्य कारण मानले जाते. त्यामुळे मुलांच्या आहारामध्ये कॅल्शियमयुक्त पदार्थ मुबलक प्रमाणामध्ये असतील ह्याची काळजी घ्यावी.

आंब्याची कोय वाळवून त्याचे चूर्ण थोड्या पाण्यासोबत घेतल्यानेही मुलांची माती खाण्याची सवय सुटल्याचे म्हटले जाते. तसेच ह्या चूर्णाच्या सेवनाने पोटातील जंत नाहीसे होण्यासही मदत होते. मुलाला दररोज एक केळे थोड्याश्या मधासोबत दिल्यानेही माती खाण्याची सवय नाहीशी होत असल्याचे म्हटले जाते. त्याचबरोबर मुलाला दररोज रात्री झोपण्यापूर्वी ओव्याची पूड कोमट पाण्यासोबत दिल्यानेही लाभ होतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment