पोर्शेने भारतात लॉन्च केली बहुप्रतिक्षित 911 GT2 RS सुपरकार


बहुप्रतिक्षित 911 GT2 RS सुपरकार जर्मनीची कार कंपनी पोर्शेने भारतात लॉन्च केली आहे. पोर्शे 911 GT2 RS ही हाय परफॉर्मन्स असलेली स्पोर्ट्स कार असून भारतीय बाजारातील पोर्शेची ही आतापर्यंतची सर्वात महागडी कार आहे.

३.८८ कोटी रुपये भारतात या कारची (एक्स-शोरूम मुंबई) किंमत ठेवण्यात आली असून ३४० किलोमीटर प्रतितास GT2 RS चा टॉप स्पीड आहे. ही गाडी अवघ्या २.८ सेकंदात ०-१००Kmph चा वेग पकडते. ३.८ लीटर बाय-टर्बो इंजिन GT2-RS मध्ये देण्यात आले आहे. ७००bhp ची पावर आणि ७५०Nm टॉर्क हे इंजिन जनरेट करते. या इंजिनसह ट्रन्समिशनसाठी ७-स्पीड ड्युअल कल्च गिअरबॉक्स देण्यात आले आहेत.

पोर्शे स्टॅबेलिटी मॅनेजमेंट या कारमध्ये देण्यात आले असून गाडी स्थिर राहण्यास याद्वारे मदत होते. त्याचबरोबर या कारमध्ये कार्बन सेरेमिक ब्रेक देण्यात आले आहेत. कारचे वजन कमी असावे यासाठी हूड, फ्रंट व्हिल, मिरर कॅप, रिअर एअर इंटेक्स आणि व्हिल आर्चला कार्बन फायबर प्लास्टिकचा वापर करुन बनवण्यात आले आहे.

Leave a Comment