वर्षभरात मुकेश अंबानी यांची २९ हजार कोटींची खरेदी


सर्वसामान्य माणूस सुद्धा सतत काही न काही खरेदी करत असतो. अनेकदा आपल्याला असाही प्रश्न पडतो कि देशतील अतिश्रीमंत व्यक्ती काय काय खरेदी करत असतील? भारतातील बडे उद्योजक आणि सर्वात श्रीमंत रिलायंसचे मुकेश अंबानी यांनी गेल्या वर्षभरात अशीच दणकून म्हणजे तब्बल २९ हजार कोटींची खरेदी केली असून त्याचा तपशील नुकताच जाहीर झाला आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार मुकेश यांनी गेल्या १२ महिन्यात १२ मोठे करार केले असून त्यात काही कंपन्या खरेदी केल्या आहेत तर काही कंपन्याचे भाग विकत घेतले आहेत. त्यासाठी त्यांनी साधारण २९ हजार कोटी रुपये मोजले आहेत. अंबानी यांचा या खरेदीमागे ग्राहकांना अधिकाधिक ऑफर्स देता याव्यात अशी हेतू असल्याचे सांगितले जात आहे.

अंबानी यांनी खरेदी केलेल्या अथवा भाग खरेदी केलेल्या कंपन्याची नवे केमरोक इंड, बालाजी टेलिफिल्म्स, आर कॉम, इंडियन फिल्म कम्बाइन, इरोज इंटरनॅशनल, सावन, जेनेसिस लग्झरी फॅशन, कायोस टेक्नो, एम्बाइब, रिया रिटेल, मलिक इंडस्ट्रीज, रेडीयस कॉर्प अशी असून यातील १० कंपन्या कन्झ्युमर व्यवसायातील आहेत. अलोक हि कार्बन फायबर कंपनी आहे तर आरकॉम हि अनिल अंबानी यांची कंपनी आहे.

Leave a Comment