मोठ्या पडद्यावर अजय देवगण साकारणार ‘चाणक्य’ !


इतिहासातील महान विद्वान ‘चाणक्य’ यांच्यावर आधारित चित्रपट बनणार असून यात बॉलीवूडचा सिंघम म्हणजेच अभिनेता अजय देवगण प्रमुख भूमिका साकारणार आहे.

ट्वीटद्वारे ही माहिती अजय देवगणने स्वत:च देताना आनंद व्यक्त केला. या चित्रपटाचा दिग्दर्शक नीरज पांडे हा असेल. तर रिलायन्स एन्टरटेन्मेंट चित्रपटाची निर्मिती करणार आहे. नीरज आणि अजय या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. पण चित्रपट कधी प्रदर्शित होणार, अजय देवगणशिवाय चित्रपटात आणखी कोण कलाकार असतील, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

अजय देवगणने याआधी भगत सिंह यांची व्यक्तिरेखा साकारली होती. ‘द लीजंड ऑफ भगत सिंह’मध्ये दमदार अभिनय केल्यानंतर आता ‘चाणक्य’ची व्यक्तिरेखा साकारणासाठी अजय देवगण सज्ज झाला आहे. भारताच्या इतिहासात महत्त्वपूर्ण स्थान असलेल्या चाणक्य यांनी आपल्या नीतीने विदेशी शासक सिकंदरच्या आक्रमणापासून भारताचे संरक्षण केले होते. आता मोठ्या पडद्यावर या महान व्यक्तीची कहाणी पाहायला मिळणार आहे.