बायकोला खांद्यावर टाकून पळण्याच्या स्पर्धेत १३ देश सहभागी


फिनलंडच्या सोंकजाखी शहरात दरवर्षी एक अनोखी स्पर्धा भरविली जाते आणि वर्षागणिक या स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद वाढता आहे. हि स्पर्धा आहे बायको अथवा मैत्रिणीला खांद्यावर घेऊन एक तास पळण्याची स्पर्धा. यंदा या स्पर्धेत १३ देश सहभागी झाले होते त्यात अमेरिका, ब्रिटन, स्वीडन या देशांचा समावेश होता. १३ देशातील ५३ जोडप्यांनी यात भाग घेतला आणि लीथूआनियाचे व्यूतास लीयुकास व त्याची पत्नी नोरिंग यांनी यात विजय मिळविला.

या स्पर्धेचा इतिहास मोठा गमतीचा आहे. गेली २३ वर्षे ही स्पर्धा भरविली जात आहे. १९ व्या शतकातील प्रसिद्ध डाकू रॉकनेन वरून या स्पर्धेची प्रेरणा घेतली गेली आहे. हा डाकू त्याच्या साथीदारांना जिवंत प्राणी, गव्हाची पोती पाठीवर टाकून पळायचा सराव करायला लावत असे. या स्पर्धेत कृत्रिम तलाव, लाकडी बॅरीअर, वाळूची जमीन असे अडथळे स्पर्धकाला पार करावे लागतात आणि कुठेही खांद्यावरून बायकोला उतरवायला परवानगी नसते. हे ओझे घेऊनच शर्यत पूर्ण करावी लागते. ही स्पर्धा तैमो माय्नेन याने ६ वेळा जिंकली होती मात्र यंदा त्याला पराभव पत्करावा लागला.

Leave a Comment