फेक न्यूज रोखण्यासाठी व्हॉट्सअॅपने घेतला जाहिरातींचा आधार


नवी दिल्ली – देशभरात खोट्या मेसेजेसमुळे हिंसक घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर व्हॉट्सअॅप या लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप कंपनीला केंद्र सरकारने कारवाईचा इशारा दिला होता. व्हॉट्सअॅपने त्यानंतर याची गंभीर दखल घेतल्याचे दिसत आहे. कारण व्हॉट्सअॅपने सरकारच्या इशाऱ्यानंतर पहिल्यांदाच मंगळवारी देशातील मुख्य वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देऊन नागरिकांना जागरुक करण्याचा प्रयत्न केला आहे.

व्हॉट्सअॅपकडून वर्तमानपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीत खोट्या मेसेजपासून सावध राहण्याच्या १० टीप्स दिल्या आहेत. तसेच फेक मेसेजला लगाम लावण्यासाठी येत्या काही दिवसांमध्ये एक नवे फीचर आणणार असल्याचेही या जाहिरातीत सांगितले आहे. केंद्र सरकारने खोट्या मेसेजला आळा घालण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे निर्देश काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअॅपला दिले होते. आता व्हॉट्सअॅपने वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देऊन 10 टीप्सद्वारे खोट्या मेसेजपासून कसे सावध राहावे याची माहिती दिली आहे.

Leave a Comment