टर्मिनेटरच्या बाईकची ३ कोटी ३० लाखात विक्री


हॉलीवूड च्या टर्मिनेटर टू या १९९१ साली रिलीज झालेल्या चित्रपटात आर्नोल्डने वापरलेली हर्ले डेव्हिडसनची फॅट बॉय बाईक नुकतीच विकली गेली असून तिला विक्रमी ३ कोटी ३० लाख रु. किंमत मिळाली. या बाईकला २ ते ३ लाख डॉलर्स मिळतील अशी अपेक्षा होती पण ती त्यापेक्षा दुप्पट म्हणजे ४ लाख ८० हजार डॉलर्सला विकली गेली.

या बाईकचा वापर प्रामुख्याने स्टन्ट साठी केला गेला होता आणि ती जेमतेम १ हजार किमी चालविली गेली होती. आजही या बाईकची कंडीशन उत्तम आहे. १९९० पासून विक्री होत असलेले फॅट बॉय हे मॉडेल आजही लोकप्रिय आहे. आर्नोल्डने टर्मिनेटर मध्ये या मॉडेलचा वापर केल्यानंतर तिच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली असे समजते.

आज बाजारात असलेल्या फॅट बॉयच्या मॉडेलला १७४५ सीसीचे टू सिलिंडर इंजिन ६ स्पीड मन्युअल गिअरबॉक्स सह दिले गेले असून तिचे प्रती लिटर मायलेज १७ किमी आहे. तिला डूअल चॅनल एबीएस सिस्टीम दिली आहे आणि तिची किंमत आहे १९ लाख १९ हजार रुपये.

Leave a Comment