ओप्पोचा स्वस्त ए ३ एस स्मार्टफोन भारतात लवकरच


चीनी स्मार्टफोन कंपनी ओप्पो त्यांच्या स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन ओप्पो ए ३ एस लवकरच भारतीय बाजारात सादर करत असल्याचे समजते. हा बजेट फोन असून त्याच्या किमती १०९९९ पासून सुरु होत आहेत. हा फोन चीनी बाजारात एप्रिल मध्ये सादर केला गेला आहे.

ओप्पो ए ३ एस २ जीबी रॅम १६ जीबी स्टोरेज आणि ३ जीबी रॅम ३२ जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरीयंट मध्ये येणार आहे. त्याला ६.२ इंची फुल स्क्रीन दिला गेला असून टॉप नॉच आहे. यात फ्रंट कॅमेरा आणि सेन्सर असतील. २ जीबीसाठी १०९९९ किंमत आहे. सेल्फी साठी ८ एमपीचा कॅमेरा दिला गेला असून तो एआय ब्युटी मोड सपोर्ट करणार आहे. रिअरला १३ आणि २ एमपीचे दोन कॅमेरे असून डूअल सीम, फेस अनलॉक अशी त्याची अन्य फिचर आहेत. अँड्राईड ८.१ ओरिओ ओएस दिली गेली असून हा फोन ४ जी ला सपोर्ट करणारा आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment