भारतात दाखल झाली ‘रिव्हर्स गिअर’वाली पहिली बाईक


मुंबई : ‘२०१८ होंडा गोल्ड विंग’ बाईकची जपानची टू व्हीलर बनवणाऱ्या कंपनीची भारतीय पार्टनर होंडाने भारतात डिलिव्हरी सुरू केली असून हि बाईक ‘रिवर्स गिअर’ असणारी ही भारतातली पहिली टू व्हीलर ठरली आहे. कोचीनमध्ये या बाईकचे तीन युनिट डिलिव्हर्ड करण्यात आले आहेत. भारतात ‘गोल्ड विंग’ ही बाईक पहिल्यांदा २०१८ च्या ऑटो एक्सपो प्रदर्शनात दिसली होती.

९३ हॉर्स पॉवर एवढी या नव्या बाईकची इंजिन क्षमता असून होंडा गोल्ड विंगमध्ये गिअर लिवर किंवा क्लच नाही. गिअर शिफ्ट एका बटनाद्वारे कंट्रोल केले जाऊ शकते. हॅन्डलबारवर हे बटन देण्यात आले आहे. या बाईकमध्ये ड्युएल क्लच ट्रान्समिशन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. या बाईकमध्ये १,८३३ सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ५,५०० आरपीएमवर १२५ बीएचपीची पावर जनरेट करते. तर हे इंजिन ४,५०० आरपीएमवर १७० न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. इंजिनला ७ स्पीड ट्रान्समिशन सिस्टम देण्यात आली आहे.

अॅप्पल कार प्ले इंटग्रेशनची सुविधाही या बाईकमध्ये देण्यात आली आहे. बाईकमध्ये ७ इंचाचा टीएफटी टचस्क्रीन देण्यात आला आहे. अॅप्पल आयफोनशी याला कनेक्ट केले जाऊ शकते. तुम्ही यामध्ये अॅप्पल मॅप, अॅप्पल म्युझिक आणि एका स्मार्ट ऑडिओ सिस्टमचा वापरही करू शकता. हा ऑडिओ सिस्टम ब्लू टूथने जोडण्यात आल्यामुळे तुम्हाला हेल्मेट काढण्याशिवाय फोन कॉलला उत्तर देता येऊ शकते.

यूएसबी पोर्ट, क्रूस कंट्रोल, इलेक्ट्रीक विंड स्क्रीनही बाईकमध्ये देण्यात आली आहे. या बाईकची किंमत जवळपास २६ लाख ८५ हजार रुपये असेल.

Leave a Comment