सॅमसंग भारतात उपलब्ध करणार ७० हजार रोजगार संधी


नवी दिल्ली – नोएडा येथे सॅमसंग जगातील सर्वात मोठे मोबाईल उत्पादन युनिट सुरू करणार आहे. आज(सोमवार) सेक्‍टर ८१ मध्ये या फॅक्टरीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी व दक्षिण कोरियाचे पंतप्रधान मून जेई इन करणार आहेत. नोएडाचे नाव याबरोबरच मोबाईल निर्मिती करणाऱ्या शहरांमध्ये सर्वात अव्वल नंबरवरती येईल. नोएडाच्या मागे याबरोबरच राहतील. ७० हजार लोकांना ३५ एकरात निर्माण होणाऱ्या सॅमसंग फॅक्‍टरीमध्ये रोजगार मिळेल.

भारताच्या चार दिवसीय दौऱ्यासाठी रविवारी दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे-इन नवी दिल्लीत दाखल झाले. सॅमसंगने १९९० मध्ये देशात आपले पहिले युनिट स्थापन केले होते. सॅमसंगची नवीन फॅक्‍टरी त्यांच्या १९९७ मध्ये स्थापन केलेल्या युनिटच्या जवळच स्थापण केली जाईल. मागील वर्षी जूनमध्ये कंपनीने ४९१५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. या युनिटमुळे कंपनीचे उत्पादन दुप्पट होईल. सॅमसंग सध्या ६.७० कोटी स्मार्टफोन भारतात निर्माण करते. नवीन युनिट सुरू होताच ही क्षमता १२ कोटी फोन प्रतिवर्ष एवढी होईल.

Leave a Comment