असा झाला नॅनोचा सुरवातीपासूनचा प्रवास


ड्रीम कार नॅनो बनविताना गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी याचा एक एसएमएस आला आणि आम्ही २ हजार कोटींची गुतंवणूक करण्याचे धाडस दाखविले. त्यामुळेच नॅनो लाँच होऊ शकली. ते दिवस कधीच विसरता येणार नाहीत अशी आठवण रतन टाटा यांनी सीएनबीसी वर एका मुलाखतीत सांगितली. सामाजिक बांधिलकी नेहमीच जपणाऱ्या टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी देशातील सर्वसामान्य लोकांना सहज परवडेल अशी चारचाकी गाडी बनविण्याचे मोठे स्वप्न पहिले आणि अथक प्रयत्नातून ते नॅनोच्या रूपाने प्रत्यक्षात आणले. मात्र या गाडीचा हा प्रवास सहजसोपा नव्हता याच्या आठवणी ते सांगत होते.

हा प्रकल्प सुरवातीला प.बंगालमधल्या सिंगूर येथे उभारला जात होता. मात्र विरोधी पक्ष आणि राजकीय दबाव यामुळे कंपनीला येथून बाहेर पडावे लागले. तो काळ कठीण होता आणि २००८ मध्ये बंगाल मधून बाहेर पडल्यावर पुढे काय असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्याचवेळी मोदी यांनी एक एसएमएस पाठवला आणि त्यावर विश्वास ठेऊन टाटानी २ हजार कोटींची गुतंवणूक केली. मोदीनी शब्द दिल्याप्रमाणे तीन दिवसात कंपनीला जागा दिली. भारतात हे एकमेव उदाहरण असेल असे सांगून रतन टाटा म्हणले, अत्यंत कमी वेळात हा करार आम्ही पूर्ण केला कारण उत्पादन सुरु होण्याअगोदरच नॅनो साठी ३ लाख ऑर्डर आम्हाला मिळाल्या होत्या आणि काहीतरी करणे भाग होते.

मोदीनी या डीलबाबत बोलताना १ रु. एसएमएसच्या खर्चावर २ हजाराची गुंतवणूक गुजराथमध्ये आल्याचे आवर्जून सांगितले होते. कंपनी नॅनोचे उत्पादन बंद करणार नाही असेही स्पष्ट केले गेले आहे.

Leave a Comment